‘शब्द कल्पिताचे’ : पत्रात लिहिणारा आणि वाचणारा अशा दोहोंचेच हृद्गत असते. काळाच्या पात्रात त्यातली तात्कालिकता विरून जाते आणि उरतो तो प्रसंगातल्या जगण्याचा गंध…

पत्र हा वाङ्मयप्रकार वापरून दोन काळांचा संवाद व्हावा, ही या संकल्पनेमागील मुख्य भूमिका होती. तिला न्याय देण्यात बरेच लेखक आपले ‘निर्मिती’चे सत्व घेऊन उतरले आहेत. काही पत्रं मात्र फारच भावविभोर झाली आहेत. ती वाचताना आपण हळहळतो. अनामिक हुरहूर लागून राहते. डोळ्यांच्या कडाही ओलावतात. अशी मनात रूतून बसणारी पत्रेही या संग्रहात बरीच आहेत. लिहिणारा आपले भावबळ घेऊन तिथे उतरला असल्याचे त्यातून स्पष्ट दिसते.......